Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता उमेश कामत दिसणार डॉक्टरांच्या भूमिकेत, पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 16:36 IST

आपल्या अभिनयाने उमेशने रसिकांची मनं जिंकली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता उमेश कामत. आपल्या अभिनयाने उमेशने रसिकांची मनं जिंकली आहेत. उमेश सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. या माध्यमातून उमेश आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. अलीकडे त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक आहे. हे उमेशच्या आगामी सिनेमा 'ताठ कणा'चे पोस्टर आहे. यात तो पाठमोरा बसलेला दिसतोय. पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित "ताठकणा" असे कॅप्शन उमेशने फोटो पोस्ट करताना दिले आहे. या सिनेमा उमेश डॉ. रामाणी यांची भूमिका साकारणारा आहे. 

प्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस, रामाणी यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे. पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने हजारो रूग्णांना आजवर वेदनामुक्त केले आहे.‘ताठ कणा’ या चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करत आहेत.

टॅग्स :उमेश कामत