Join us

"खऱ्या आयुष्यात ...", हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:11 IST

सुबोधचा हर हर महादेव (Har Har Mahadev) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून सुबोध भावे(Subodh Bhave)ची ओळख आहे. सध्या सुबोध भावेने सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सुबोधचा हर हर महादेव (Har Har Mahadev) सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आता सोशल मीडियावर अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

नुकताच सुबोध भावेचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्त अनेकांनी त्याला वैयक्तिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्यांचं आभार मानण्यासाठी सुबोधनं एक खास पोस्ट केली आहे. यात त्याने साकारलेल्या विविध भूमिकांचा कोलाज आहे. 

सुबोधची पोस्ट माझ्या जन्मदिनी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्या कायम स्मरणात राहतील. माझ्या परीने मी सर्वांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला,पण मला माहिती आहे की सगळ्यांना तो देऊ शकलो नाही. तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे आणि नेहमीच असीन.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो.काय मिळवलं?- खऱ्या आयुष्यात आभाळाएवढ मोठं काम करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या.प्रभू श्री राम,छत्रपती शिवराय,निवृत्ती महाराज,तुकाराम महाराज,बिरबल,पहिले बाजीराव,बसवेश्वर महाराज,लोकमान्य टिळक,बालगंधर्व,काशिनाथ घाणेकर! 

स्वतःचे वेगळं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या काल्पनिक व्यक्तिरेखा साकारता आल्या. आणि कलेवर उदंड प्रेम करणारे तुमच्या सारखे रसिक.पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार! याच साठी केला होता अट्टहास..... 

सुबोधच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सुबोधचा हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे.

टॅग्स :सुबोध भावे सेलिब्रिटी