Join us

अभिनेता सागर देशमुखला हृदय विकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 17:04 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सागर देशमुख याला हृदय विकाराचा सौम्य झटका आला असून त्याला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सागर देशमुखला आला हृदय विकाराचा सौम्य झटका सागरवर कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सागर देशमुख याला हृदय विकाराचा सौम्य झटका आला असून त्याला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते आहे. 

'हंटर' हिंदी चित्रपट, 'वाय झेड' मराठी चित्रपटात अभिनेता सागर देशमुखने मुख्य भूमिका साकारली असून आता तो भाई व्यक्ती आणि वल्ली या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तो पु.ल. देशपांडे यांच्या भूमिका साकारणार आहे.( सविस्तर वृत्त लवकरच)