Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्तीच्या घटस्फोटाच्या चर्चेला अभिनेत्यानं लावला पूर्णविराम, शेअर केला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 10:58 IST

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्तीच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) बऱ्याचदा त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. मात्र सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती (Trupti Jadhav) यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ते घटस्फोट घेत असल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांना सिद्धार्थ जाधवने या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगितले होते. मात्र तरीदेखील त्यांच्या नात्यातील दुराव्याची चर्चा थांबली नाही. अखेर सिद्धार्थ आणि तृप्ती यांची मुलगी स्वरा हिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फॅमिली फोटो शेअर करून अभिनेत्याने या चर्चेला पूर्णविराम लावले आहे.

नुकताच सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती यांची मुलगी स्वरा हिचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या घटस्फोटांच्या वृत्ताला अखेर पुर्णविराम लागला आहे. 

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ पत्नी आणि मुलींसोबत दुबई ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं फक्त मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असे केले आहे. तिने नावामधील जाधव हे आडनाव हटवल्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर धरला. मात्र आता त्यांचा फॅमिली फोटो पाहिल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे पाहून चाहते खूश झाले आहेत.

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती यांचे लव्हमॅरेज असून त्यांनी २००७ साली लग्न केले. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ जाधव