Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेप करताना ‘मजा आ रहा है ना’; मकरंद देशपांडे यांनी सांगितली एका प्रसंगाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:15 IST

अभिनेता मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या सभोवताली घडलेला एक अनुभव सांगितला आहे.    

चित्रपटांपेक्षा नाटकात रमलेले ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे ‘बलात्कार प्लीज स्टाॅप इट’ हे नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या फार पूर्वी आलेल्या ‘अंत’ चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण सांगितली. या चित्रपटात ते एका बलात्कारी गुन्हेगाराच्या पात्रात होते. 

बलात्काराचा प्रसंग चित्रित झाल्यानंतर चित्रीकरण बघण्यास आलेल्या काही जणांनी ‘मजा आ रहा है ना’ असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी काहीच बोलू शकलो नव्हतो आणि मनात बलात्कारासारख्या बीभत्स घटनाही लोक कसे काय एंजॉय करू शकतात, असा सवाल उपस्थित झाल्याचे मकरंद म्हणाले. तशाच घटनांचा कोलाज म्हणून हे नाटक असल्याचेही त्यांनी सांगितले.