Join us

या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 17:47 IST

आकाशने त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे. रॉकिंग अंदाज, स्टाइल आणि पिळदार बॉडी यामुळे त्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.

हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता सा-यांचा लाडका परश्या म्हणजे आकाश ठोसर.

आकाशने त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे. रॉकिंग अंदाज, स्टाइल आणि पिळदार बॉडी यामुळे त्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आकाश ठोसर आता आगामी वॉर-एपिक सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स'मध्‍ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्‍दर्शित या सिरीजमध्‍ये अभय देओल व सुमीत व्‍यास यांच्‍यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत.

या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत केली आहे.'१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्‍यात न आलेली कथा सादर करण्‍यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्‍या कथेला देखील दाखवते.

शूरवीरांपैकी एकाच्‍या भूमिकेत दिसण्‍यात येणा-या आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्‍याचे लष्‍करामध्‍ये जाण्‍याचे बालपणापासून स्‍वप्‍न होते. तो म्‍हणाला, ''सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' माझ्यासाठी स्‍वप्‍नवत प्रोजेक्ट आहे.

टॅग्स :आकाश ठोसर