Join us
Daily Top 2Weekly Top 5

निपुणचा समावेश 'फोर्ब्स' च्या यादीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 21:21 IST

दळण, लुज कंट्रोल, सायकल या एकांकिकांसह एक दिवस मठाकडे या दीघार्काचे दिग्दर्शन करणाºया पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील दिग्दर्शक ...

दळण, लुज कंट्रोल, सायकल या एकांकिकांसह एक दिवस मठाकडे या दीघार्काचे दिग्दर्शन करणाºया पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याचे नाव प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या फोर्ब्स इंडिया मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकले आहे. विविध क्षेत्रातील ३० युवकांना या यादीमध्ये स्थान दिले जाते. निपुणने मराठी रंगभूमीचा झेंडा फडकावत हे स्थान पटकाविले आहे.खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच गायक राहुल देशपांडे यांच्यासोबत निपुणने संशयकल्लोळ मानापमानआणि सौभद्र ही संगीत नाटके सुद्धा वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित करून त्याने युवा पिढीला संगीत रंगभूमीकडे आकर्षित केले. चला तर, निपुणला त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देउयात.