Join us  

Video: रोमॅण्टिक हिरो झाले अभिजीत बिचुकले; प्रेम कवितांच्या अल्बममध्ये दिसली लव्हर बॉयची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 11:04 AM

Abhijeet bichukale: अभिजीत बिचुकले यांचा रोमॅण्टिक अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) हे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही घरात नवीन नाही. बिग बॉस मराठीमध्ये (Bigg boss marathi) आपल्या अतरंगी अंदाजामुळे ते कायम चर्चेत राहिली. इतकंच नाही तर बऱ्याचदा राजकीय वक्तव्य करुनही ते चर्चेत येत असतात. परंतु, यावेळी ते त्यांच्या रोमॅण्टिक अंदाजामुळे चर्चेत आले आहेत.  व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांचा पहिलावहिला प्रेम कविता असलेला म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बममध्ये अभिजीत चक्क लव्हर बॉयच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले आहेत.काही दिवसांपूर्वीच अभिजीत यांनी त्यांच्या प्रेम कवितांच्या म्युझिक अल्बमचा टीझर रिलीज केला होता. हा टीझर प्रचंड व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या अल्बमच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा नवा अंदाज पाहायला मिळाला. अल्बमचा टीझर रिलीज करण्यासोबतच त्यांनी तरुणांना एक सल्लाही दिला आहे.

''व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे कॉलेजच्या दिवसांमध्ये जे काही करत होतो आणि कलाकार म्हणून ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येणार आहेत. तुमचं आयुष्य जगत असताना स्वतःचे ध्येय आणि धोरणं ठरवा. व्यसनाच्या पाठी लागू नका आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर, आदर्शवत म्हणून अभिजीत बिचुकले म्हणजे माझ्याकडे पाहा, असा सल्ला देत अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या."

पुढे ते म्हणतात, "मी गीतकार,संगीतकार आणि गायक सुद्धा आहे. अभिनेता, सेलिब्रिटी आणि राजकीय नेतादेखील आहे. मी माझी मतं ठामपणे मांडतो. माझ्यातल्या एका जरी गुण तुम्ही स्वीकारला तरी तुम्ही नक्कीच मोठे होऊ शकता. पण, शेवटी तुमचं नशीबच तुमच्या बरोबर आहे."

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांना पहिल्यांदाच अशा अंदाजात पाहिल्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :अभिजीत बिचुकलेटेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉस मराठी