Join us

'अब पैसा कौन देगा रे...', प्रिया बापटची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:21 IST

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे

मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). मालिका, चित्रपट, वेब सीरिज या माध्यमांमधून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. सध्या प्रिया तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तरीदेखील ती सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहेत. प्रियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती डोक्यावर हात मारून मिश्किल हसताना दिसतेय. या फोटोत तिच्या हातात ब्लॅक बॅग दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्ही मोठी हॅण्डबॅग घेता आणि पर्स घरीच विसरता. अब पैसा कौन देगा रे..

प्रिया बापटच्या या पोस्टवर अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने लिहिले की, पेटीएम करो..हाहाहाहा. तर तिच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले की, आता मजा येणार.. दुसऱ्या युजरने म्हटले की, अब पैसा कोण देगा रे?मी नाही देणार फक्त एक रुपया चा डॉलर आहे माझ्याकडे. आणखी एका युजरने म्हटले की, हबी (नवरा) देगा रे पैसा, डोन्ट वरी. प्रियाला तिच्या चाहत्यांनी पेटीएम आणि जीपेचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे.

प्रिया शेवटची २०१८ साली आम्ही दोघी चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाली नाही. लवकरच ती ‘विस्फोट’ या हिंदी सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत फरदीन खान आणि रितेश देशमुख दिसणार आहेत.

टॅग्स :प्रिया बापट