Join us

आरोह वेलणकरच्या WHY So गंभीर या नाटकाला मिळत आहेत खूप चांगल्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 20:30 IST

आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्याने कधीच व्यवसायिक रंगभूमीवर काम केले नव्हते. पण पहिल्यांदाच तो व्यवसायिक नाटक करत आहे.

ठळक मुद्देपहिल्या प्रयोगाला आरोह आणि पल्लवीच्या फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटक आणि आरोह, पल्लवी यांचा अभिनय खूपच चांगला असल्याचे त्यांचे फॅन्स, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. 

रेगे' सिनेमाच्या यशानंतर अल्पावधीतच आरोह वेलणकर रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला. घंटा, होस्टेल डेज या चित्रपटात देखील त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्याने चित्रपटांसोबत काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या तो एका वेगळ्या अंदाजात रसिकांना पाहायला मिळणार आहे.

आरोहने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे, त्याचा स्वत:चा या क्षेत्रात मोठा व्यवसाय आहे, मात्र आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून अभिनयक्षेत्राचे धडे गिरवायला सुरुवात केली. आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्याने कधीच व्यवसायिक रंगभूमीवर काम केले नव्हते. पण पहिल्यांदाच तो व्यवसायिक नाटक करत आहे. त्याच्या या नाटकाचे नाव WHY So गंभीर असे असून हे नाटक नुकतेच म्हणजेच 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या नाटकाद्वारे चार वर्षांनंतर आरोह रंगभूमीवर परतत आहे. अनेक वर्षं प्रायोगिक रंगभूमीवर काम केल्यानंतर आता व्यवसायिक रंगभूमीवर काम करायला तो खूपच उत्सुक आहे. 

WHY So गंभीर या नाटकात आरोह वेलणकरसोबत पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत आहे. गांभीर्यानं घ्यावं असं विनोदी नाटक अशी या नाटकाची टॅगलाइन असून या नाटकाचा शुभारंभ 23 डिसेंबरला यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे झाला. या पहिल्या प्रयोगाला आरोह आणि पल्लवीच्या फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटक आणि आरोह, पल्लवी यांचा अभिनय खूपच चांगला असल्याचे त्यांचे फॅन्स, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. 

WHY So गंभीर या नाटकाची निर्मिती अथर्व थिएटर्सची असून निर्माते संतोष भरत काणेकर आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अमोल भोर आणि गिरीश दातार यांनी केले आहे तर नाटकाचे लेखक गिरीश दातार हेच आहेत. 

WHY So गंभीर या नाटकाचे पोस्टर अथर्व थिएटरने त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केले होते. या नाटकाचे नाव WHY So गंभीर असले तरी या नाटकाच्या पोस्टरमध्ये पल्लवी आणि आरोहच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आपल्याला पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :पल्लवी पाटील