आमिर खानला ही सैराटच येड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 10:14 IST
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्र झिंगाट झाला आहे. सिनेमागृहाची पायरी देखील न पाहिलेला माणूस आज प्रत्यक्ष ...
आमिर खानला ही सैराटच येड...
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्र झिंगाट झाला आहे. सिनेमागृहाची पायरी देखील न पाहिलेला माणूस आज प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन चित्रपटाला दाद देत आहे. तसेच मराठी चित्रपटाचा इतिहास घडवत सिनेमागृहातच अक्षरश: प्रेक्षकांना झिंगाट या गाण्यांवर पाय थिरकविण्याचा मोह देखील आवरला नाही. अशा या मराठी इंडस्ट्रीचा इतिहास बनविणारा सैराट या चित्रपटाचं येडं बॉलीवुडचा परफेक्शनीस्ट आमिर खान याला ही लागलेल दिसत आहे. कारण नुकेतच आमिरने सैराट पाहून ट्विीटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तिने सैराट या चित्रपटावर तीन ट्विीट केले आहे. पहिल्या ट्विीटमध्ये आमिर म्हणतो, माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटाच्या शेवटच्या धक्कयातून अजून सावरतोय. }}}}दुसºया ट्वीटमधून आमीरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख यांचे देखील कौतुक केले आहे. सैराटच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांसह झीचं अभिनंदन केले आहे. }}}}त्याचबरोबर तिसºया ट्विीटमध्ये आमिरने सैराट हा चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले आहे. }}}}