इंदिरा या नाटकाचा रंगणार ५० वा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 13:19 IST
मराठी रंगभूमीवरील इंदिरा नाटकाचा सुवर्णमहोत्सवी ५०वा प्रयोग लवकरच रंगणार आहे. महाद्वार-रसिका निर्मित आणि अनामिका प्रकाशित इंदिरा नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन ...
इंदिरा या नाटकाचा रंगणार ५० वा प्रयोग
मराठी रंगभूमीवरील इंदिरा नाटकाचा सुवर्णमहोत्सवी ५०वा प्रयोग लवकरच रंगणार आहे. महाद्वार-रसिका निर्मित आणि अनामिका प्रकाशित इंदिरा नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांनी केले आहे.इंदिरा गांधींवर आधारित नाटक हे रंगभूमीवरील एक नवीन प्रयोग आहे. या नवीन प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली म्हणूनच तर हे नाटक त्याच्या ५०व्या यशस्वी प्रयोगाकडे वळतंय. या नाटकात इंदिरा गांधी यांची भूमिका सुप्रिया विनोद यांनी साकारली आहे. तसेच विक्रम गायकवाड, नकुल घाणेकर, सतीश आगाशे, अतुल महाजन, शिरीष घाग, लीना पंडीत, सुयश पुरोहित, जितेंद्र आगरकर, मनाली काळे, पूर्वा नीलिमा सुभाष, भूषण गमरे या कलाकारांचा देखील नाटकमध्ये समावेश आहे.