दिशा थिएटर्स आणि मल्हार आर्टस निर्मित ‘टॉस’ या नाटकाचा आज ५०वा प्रयोग ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे ८:३० वाजता होणार आहे.
सौ. पद्मजा नलावडे आणि सौ. उषा झोडगे निर्मित ‘टॉस’ या नाटकाचे लेखन प्रविण शांताराम आणि दिग्दर्शन सुदेश म्हशिलकर यांनी केले आहे. या नाटकामध्ये सुनील गोडबोले, पूजा अजिंक्य, तेजस डोंगरे, रेणुका भिडे, संपदा जोगळेकर व विघ्नेश जोशी यांचा अभिनय आहे. नेपथ्य आणि प्रकाश योजनेची जबाबदारी सुनील देवळेकर यांनी सांभाळली आहे.
एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना आपण गोंधळून गेल्यावर छापा व काटा यांच्या मदतीने टॉस करतो. अशाच आशयाशी निगडीत टॉस हे कौटुंबिक नाटक आज ५०व्या प्रयोगासाठी सज्ज झालं आहे.