Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:48 IST

प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लगीनसराई पाहायला मिळते आहे. नुकतेच कोमल कुंभार, सूरज चव्हाण, पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवडे विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आज महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णीने कोमल भास्करसोबत सातफेरे घेतले आहेत. त्यानंतर आणखी एका अभिनेत्री लग्नगाठ बांधली आहे, तेही दुसऱ्यांदा. हो. हे खरंय. 'संगीत देवभाबळी' नाटकातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने निर्माता सुमित म्हशीलकरसोबत ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा फोटो पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर, २०२५ मध्ये ते वेगळे होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता. आता शुभांगीने दुसरं लग्न केलं आहे. तिने प्रेमाची गोष्ट मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकरसोबत काल म्हणजेच ५ डिसेंबर रोजी लग्न केलं. तिच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर फोटो पाहायला मिळाला. 

वर्कफ्रंटशुभांगी सदावर्तेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 'संगीत देवबाभळी' या गाजलेल्या नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. तिने नाटकासोबतच 'लक्ष्य' आणि 'नवे लक्ष्य' या लोकप्रिय मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर ती 'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटामध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.