२०१६ ला प्रिया बापट कुठे करत आहे... बाय बाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 11:49 IST
२०१६ या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येकजण धमाल नियोजन करत असतो. आनंद आणि उत्साहाने या वर्षाचा शेवट साजरा करण्याचा सगळयांचा ...
२०१६ ला प्रिया बापट कुठे करत आहे... बाय बाय
२०१६ या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येकजण धमाल नियोजन करत असतो. आनंद आणि उत्साहाने या वर्षाचा शेवट साजरा करण्याचा सगळयांचा प्रयत्न असतो. या प्रयत्नामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. कारण कलाकारांचे आयुष्य हे फार धावपळीचे असते. कॅमेरा, अॅक्शन, टेक, रिटेक या चंदेरी दुनियेत त्याचे आयुष्य अगदी हरविल्यासारखे असते. त्यांना स्वत:साठीदेखील वेळ नसतो. अशावेळी हे कलाकार एका धमाल ट्रीपचे आयोजन करत असतात. अशाच एक ट्रीपचा आनंद प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट लुटत असताना दिसत आहे. ही अभिनेत्री पाँडिचेरी येथे २०१६ या वर्षाला अगदी वजनदार स्टाइलने अलविदा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच तिने सोशलमीडियावर पाँडिचेरी येथे मित्रासोबत कल्ला करतानाचे काही फोटो अपलोड केले आहेत. त्याचबरोबर सेरेन्टी बीचवर शांत आणि खळखळत्या समुद्राच्या सान्निध्यात ती २०१६ या वर्षाला बाय बाय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने या शहरातील नवीन लोकांची ओळखदेखील करून घेतली असल्याचे दिसत आहे. कारण माझे नवीन मित्र म्हणून तिने या शहरातील लोकांसोबतचे काही फोटोदेखील अपलोड केले आहे. त्याचप्रमाणे तिच्या या झक्कास ट्रीपची सुरूवात फिल्टर कॉफीने झाली असल्याचेदेखील तिने सोशलमीडियावर सांगितले आहे. प्रियाच्या या पाँडिचेरी ट्रीपच्या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स आणि कमेंन्ट मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रिया बापटचा काही दिवसांपूर्वीच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी तिने वाढविलेल्या वजनासाठी तिचे विशेष कौतुक करण्यात आले होते. तसेच प्रियाने मराठी चित्रपटसृष्टीला टाइमपास २, टाइमप्लीज, काकस्पर्श, हॅपी जर्नी असे अनेक चित्रपट दिले आहेत.