20 चिमुकल्यांचा कल्ला.......
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 12:46 IST
रुपेरी पडद्यावर सिनेमात बालकलाकारांच्या भूमिका आपण पाहत असतो.. या सिनेमात फार फार एक-दोन किंवा चार-पाच बालकलाकार असतात... मात्र एखाद्या ...
20 चिमुकल्यांचा कल्ला.......
रुपेरी पडद्यावर सिनेमात बालकलाकारांच्या भूमिका आपण पाहत असतो.. या सिनेमात फार फार एक-दोन किंवा चार-पाच बालकलाकार असतात... मात्र एखाद्या सिनेमात यापेक्षा अधिक बालकलाकारांचा कल्ला तुम्ही पाहिला नसेल.आता एक दोन नाही तर वीस बालकलाकारांची धम्माल मज्जा मस्ती रसिकांना मराठी पडद्यावर अनुभवता येणार आहे..... भूतनाथ फेम पार्थ भालेराव, दृष्यम फेम मृणाल जाधव, मोहित गोखलेसह 20 छोट्यांचा कल्ला रुपेरी पडद्यावर दिसेल.या बच्चेकंपनीला साथ देण्यासाठी असेल ती मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले. रिअल लाइफमध्ये पुण्यात एका एनजीओमध्ये शिकवणारी मृण्मयी या सिनेमात 20-20 बालकलाकारांसोबत वावरली आहे. मात्र एक दोन नाही 20 छोट्या छोट्या बॉम्बप्रमाणे असणा-या चिमुकल्यांसह मृण्मयीनं धम्माल केली आहे.