Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माय माझी 'मराठी' अभिजात भाषा...", मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:22 IST

नुकतीच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खास पोस्ट शेअर केली आहे.  

Tejaswini Pandit: महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचं संवर्धन तसेच गौरव करणं हे या दिवसाचं मुख्य औचित्य आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तसेच मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचनिमित्ताने मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  

तेजस्विनी पंडितसोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. यामाध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्यासह आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती ती चाहत्यांना देते. नुकतीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुंदर शब्दांत पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. आजचा नखरा पण मराठीच असायला हवा नाही का? माय माझी “मराठी “ #अभिजातभाषा..., मराठीसाठी झटलेल्या आणि मराठी टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा... अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तेजस्विनी या दिवसाच्या निमित्ताने मराठमोळा लूक करून तयार झाली आहे. 

दरम्यान, तेजस्विनी पंडितच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रार्थना बेहरे, स्वप्नील जोशी आणि कुशल बद्रिके यांसारख्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :तेजस्विनी पंडितमराठी भाषा दिनसेलिब्रिटीसोशल मीडिया