Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या पूजा सावंतने शेअर केला फोटो, म्हणाली, "अजुनही मेंहदी हातावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:06 IST

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. 

Pooja Sawant : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.  मोठ्या दिमाखात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. अभिनेत्रीचा साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळदीसोबतच लग्नाच्याही चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. 

कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी तसेच नातेवाईकांच्या साक्षीने सिद्धजाने सप्तपदी पूर्ण केली. लग्नानंतर सिद्धीविनायकाचं दर्शन आणि त्यानंतर हे जोडपं हनिमुनला निघालं. त्यांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लग्नाच्या सात दिवसानंतर हे पूजा आणि सिद्धेश हनिमुनसाठी निघाले.

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंतने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये पूजा सावंतने तिच्या हनिमुन डेस्टिनेसनसह तिचा फोटो शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केस मोकळे सोडत तिने हे फोटो काढलेत. या फोटोमध्ये नववधू पूजाचा नुर चढलेलाच दिसतोय. तिचं सौंदर्य आणखी खुलून आलंय. 

लग्नाला १३ दिवस उलटले तरीही हातावर मेंहदीचा रंग कायम टिकून आहे.'अजुनही मेंहदी हातावर आहे, असं कॅप्शन देत पूजा सावंतने ही दुसरी स्टोरी सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. या स्टोरीमध्ये हातात हिरवा चुडा, मेंहदीने रंगलेला हात असा नववधूच्या परफेक्ट लूकमध्ये अभिनेत्री दिसत आहे.

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटी