Join us

बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल असा डान्स, "ये मेरा दिल..." गाण्यावर थिरकली योगिता चव्हाण, जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:17 IST

योगिताने तिच्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती "ये मेरा दिल प्यार का दिवाना" या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'मुळे अभिनेत्री योगिता चव्हाण चर्चेत होती. योगिता बिग बॉस मराठी ५मध्ये सहभागी झाली होती. 'जीव माझा गुंतला' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. योगिता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. लाइफमधील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. अनेक रील व्हिडीओही योगिता शेअर करते. 

नुकतंच योगिताने तिच्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती "ये मेरा दिल प्यार का दिवाना" या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. योगिताचे डान्स मुव्ह्स हे कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, योगिताने ऑनस्क्रीन नवरा असलेल्या सौरभ चव्हाणशी लग्न केलं आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेत त्यांनी ऑनस्क्रीन पतीपत्नीची भूमिका साकारली होती. मालिकेच्या सेटवरच ते प्रेमातही पडले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठी