Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शिवा' मालिकेत वर्षा उसगांवकर अन् मेघना एरंडेची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वाच्या भूमिकेत, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:04 IST

छोट्या पडद्यावरील 'शिवा' मालिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

Shiva Serial: छोट्या पडद्यावरील 'शिवा' मालिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेतील शिवा, आशू, सिताई आणि  रामभाऊ, दिव्या, चंदन, किर्ती ही पात्रे प्रेक्षकांना आपलीशी  वाटू लागली आहेत. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आशू-शिवाची धमाल केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. दरम्यान, नुकताच मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि  मेघना एरंडेची एन्ट्री झाली आहे. हा प्रोमो चांगलाच व्हायरल होतो आहे. 

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर  'शिवा' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मेघना एरंडे यांची झलक पाहायला मिळतेय. या मालिकेत त्या सीताईच्या मैत्रिणी कावेरी आणि राणीची साकारणार भूमिका साकारणार आहेत. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, "राणी आणि कावेरीच्या येण्याने सिताई जुन्या आठवणींत रमणार...",असं कॅप्शन दिलं आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केल्याचे कमेंट्समधून दिसत आहे.

सध्या हा प्रोमो पाहून प्रेक्षक सुद्धा सुखावले. बऱ्याच कालावधीनंतर वर्षा उसगांवकर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. आता मालिकेत कावेरी आणि राणी पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :वर्षा उसगांवकरटेलिव्हिजनसोशल मीडिया