Join us

लग्नानंतर तितीक्षाचं 'सातव्या मुलीची..'च्या सेटवर ग्रँड वेलकम; भारावून गेली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:05 IST

Titeekshaa tawde: लग्नाच्या सात दिवसानंतर तितीक्षा पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मोठ्या थाटात तितीक्षाने २६ फेब्रुवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची मराठी कलाविश्वात प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या सात दिवसात तितीक्षा तिच्या कामाकडे वळली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या सेटवर तितीक्षाचं ग्रँड वेलकम करण्यात आलं.

तितीक्षा आणि सिद्धार्थ यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. हळदी, संगीत, मेहंदी असे सगळेच सोहळे मोठ्या दणक्यात झाले. तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.त्यामुळे बराच काळ कलाविश्वात या लग्नाची चर्चा होती. मात्र, आता सिद्धार्थ आणि तितीक्षा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या करिअरवर फोकस केला आहे. त्यामुळेच तितीक्षा लगेचच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर परतली. यावेळी सगळ्या टीमने तिचं दणक्यात स्वागत केलं.

अभिनेत्री एकता डांगरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तितीक्षाच्या ग्रँड वेलकमचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तितीक्षाला तिच्या सहकलाकारांनी अनेक गिफ्ट्स दिले, खास तिच्यासाठी केकही आणला होता.

दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे, सुरुची अडारकर यांनी तितीक्षाचं ग्रँड वेलकम केलं आहे.

टॅग्स :तितिक्षा तावडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारऐश्वर्या नारकर