Tejaswini Pandit: मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते आहे.आजवर तिने विविध धाटणीच्या सिनेमांमधून वैविध्यपू्र्ण भूमिका साकारल्या आहेत. तेजस्विनी पंडितसोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
तेजस्विनी पंडित हिचे वडील रणजित पंडित यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत म्हटलंय, "ह्यावेळेला एकट्याने नाही, आई बरोबर छान साजरा करा...",तेजस्विनीची ही स्टोरी पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. त्याचबरोबर तिने आई ज्योती चांदेकर आणि वडील रणजीत पंडित यांचा एकत्रित फोटो देखील स्टोरीला शेअर केला आहे.
वडील हयात असताना स्वतःचं घर झालं नाही, ही खंत तेजस्विनीला नेहमी जाणवत आली. आज मिळवलेलं यश पाहायला वडील असते तर किती छान झालं असतं, हे ती वारंवार सांगत आली आहे. आईच्या निधनानंतर आता दोघांची भेट कुठेतरी झाली असेल आणि ते तिथे आनंदात असतील, अशी आशादेखील तिने व्यक्त केली आहे.
वर्कफ्रंट
अनेक मराठी चित्रपटांत काम केलेली तेजस्विनी हिंदी सिनेमातही झळकली. ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमात तिने शृपणखाची भूमिका साकारली होती. तेजस्विनीने 'रानबाजार', 'समांतर', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.अभिनयाबरोबरच तिने नुकतंच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे.