Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये हसी वादिया, ये खुला आसमाँ..सारं काही विसरत ही मराठमोळी अभिनेत्री निघाली व्हॅकेशनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:33 IST

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय या अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.

भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत असतात.

रिफ्रेश व्हायचे मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने ठरवले आहे. म्हणूनच की काय ती सध्या काश्मीरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजश्री बर्फामध्ये खेळताना दिसतेय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

 तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

 तेजश्री प्रधान शेवटची अग्गंबाई सूनबाई मालिकेत पाहायला मिळाली होती. ही मालिका संपल्यानंतर बराच काळ सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती. मात्र आता नुकतेच तिने एका चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये केले आहे. यात तिच्यासोबत अजिंक्य देव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान जम्मू-काश्मीर