Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेनंतर ही मराठी अभिनेत्री लग्नाच्या बेडीत, पाहा तिच्या मेहंदीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 14:53 IST

'आभाळमाया' मालिकेत ही अभिनेत्री दिसली होती.

अभिनेत्री परी तेलंग सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते. लवकरच परी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. परीने मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी दिली आहे. परीच्या या फोटोंवर त्याच्या फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होतेय. परीच्या मेहंदीच्या फोटोंमध्ये मराठी कलाकारसुद्धा दिसतायेत. सुकन्या कुलकर्णी, सुलेखा तळवळकर यांचा समावेश दिसतोय. परी खूपच खूश दिसतेय.

नोव्हेंबर महिन्यात परीने आपल्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र त्याचे नाव तिने गुलदस्त्यात ठेवणेचे पसंत केले. परीच्या लग्नाच्या फोटोंची तिचे फॅन्स मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून परी तेलंग हे नाव घराघरात पोहोचले आहे. परीने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. परी तेलंग हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. परीने हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. बालकलाकार म्हणून ही तिने काम केले आहे. लक्ष्य ही तिची मालिका चांगलीच पसंती मिळाली. यात तिने साकारलेल्या इन्स्पेक्टरच्या भूमिका गाजली होती. परीने भरतनाट्यामचे प्रशिक्षण घेतले आहे. 

टॅग्स :परी