Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतील मंजोलिका पाहिलीत का? फोटो पाहून उडाली ना तुमची घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:56 IST

नम्रता आवटे संभेराव हिने नुकताच सोशल मीडियावर तिचा भयानक लूकमधील फोटो शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता आवटे हिने आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोची सध्या सगळीकडे खूप चर्चा होत आहे. कारण या फोटोत ती खूपच भयानक लूकमध्ये दिसत आहे. 

नम्रता आवटे संभेरावने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करून या मागचे सत्य सांगितले आहे. ती म्हणाली की, या भीतीदायक फोटोमध्ये लपले आहे एक विनोदी सत्य. खूप दिवसांनी एका दिवसाकरिता सामील झाले महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत. हॉरर कॉमेडी. मेकअप मीच केला आहे.

नम्रता नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने केलेल्या अॅक्टचा लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला. 

नम्रताने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचे नाव रुद्राज असे ठेवले आहे. तिने प्रेग्नेंसी दरम्यान काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आता नम्रता पुन्हा छोट्या पडद्यावर कधी दिसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

'व्हेंटिलेटर', 'बाबू बँड बाजा', 'लूज कंट्रोल' यासारख्या विविध चित्रपटात नम्रताने महत्वाच्या भूमिका साकारल्या. यासोबतच तिने हिंदीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली.  

आदत से मजबूर या हिंदी मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली. याशिवाय रंगभूमीही नम्रताने गाजवली. आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल या नाटकांमधील तिच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले आहे. 

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावसोनी मराठी