Join us

लग्नाचा ‘हा’ व्हिडीओ मानसी नाईकसाठी आहे खूपचं खास; म्हणाली, नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:55 IST

Manasi Naik : हा व्हिडीओ मानसीच्या लग्नांनंतरचा आहे. त्यामध्ये ती नवऱ्यासोबत रंगपाणी खेळताना दिसत आहे.

ठळक मुद्देमानसी व प्रदीप दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर यावर्षी 19 जानेवारीत मानसी व प्रदीप लग्नबंधनात अडकले.

‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक  (Manasi Naik) काही महिन्यांपूर्वीच रेशीमगाठीत अडकली. इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मानसीने लग्नगाठ बांधली. मानसीच्या या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण हा व्हिडीओ तुम्ही कदाचित पाहिला नसावा. कारण हा लग्नाचा नाही तर लग्नानंतरचा व्हिडीओ आहे. मानसीने आत्ता कुठे हा व्हिडीओ शेअर केला आहे.हा व्हिडीओ माझ्यासाठी खुपचं खास आहे, नक्की पाहा, असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

नववधू पहिल्यांदा सासरचे माप ओलांडते, तेव्हा अनेक विधी केल्या जातात. याची एक झलक मानसीने शेअर केलेल्या या व्हिडीओत पाहायला मिळतेय. व्हिडीओत नववधूच्या पोशाखात असलेली मानसी आणि तिचा पती प्रदीप रंगपाणी खेळताना दिसत आहेत. अंगठी शोधण्यात प्रदीप प्रत्येकवेळी बाजी मारताना दिसत आहे. 

मानसी व प्रदीप दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर यावर्षी 19 जानेवारीत मानसी व प्रदीप लग्नबंधनात अडकले.  मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ?ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :मानसी नाईक