Join us

कमाल की बेइज्जती हैं! 'स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्या हेमंतची क्षितीने घेतली फिरकी; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:30 IST

Hemant dhome: हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर भन्नाट कमेंट करत क्षितीने त्याची विकेट पाडली आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकाच अभ्यासू अभिनेता म्हणजे हेमंत ढोमे (hemant dhome). उत्तम अभिनयासह लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्याने नावलौकिक मिळवला आहे. हेमंत कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे नवनवीन पोस्टच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या भेटीला येत असतो. अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टवर त्याच्या पत्नीने क्षिती जोगने (kshiti jog) भन्नाट कमेंट केली आहे.

हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केला असून चष्मा घालून मस्त फोटोसाठी पोझ दिली आहे. परंतु, या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनची क्षितीने फिरकी घेतली आहे.

“वाघ तर आपण लहानपणापासून होतोच! शिकार आत्ता आत्ताच करायला लागलोय…” असं कॅप्शन हेमंतने या फोटोला दिलं आहे. हेमंतच्या या फोटोवर त्याची पत्नी,अभिनेत्री क्षिती जोगने कमेंट केली आहे. “कसली शिकार? पालीची? कारण तेवढंच शक्य आहे आता”, असं क्षितीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हेमंतच्या पोस्टवरील क्षितीची ही कमेंट पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे.

दरम्यान, हेमंतने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच तो उत्तम दिग्दर्शकही आहे. अलिकडेच त्याने दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट  प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजल्यामुळे त्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन