Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ही नक्कीच मागच्या जन्माच्या कर्माची फळं...’; क्रांती रेडकरने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:16 IST

Kranti Redkar : एक भन्नाट किस्सा क्रांतीने ताज्या व्हिडीओत शेअर केला आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. वेगवेगळे रील्स, व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. सध्या काय तर विषय कानातल्या झुमक्यांचा, पण क्रांतीने अगदी वेगळ्या पद्धतीने तो चाहत्यांशी शेअर केला आहे. होय, कार्यक्रम, समारंभात गेल्यावर क्रांतीचे कानातले हटकून कुठे तरी हरवतात किंवा तुटतात. असाच एक भन्नाट किस्सा क्रांतीने ताज्या व्हिडीओत शेअर केला आहे.

व्हिडीओत ती म्हणते...माझ्यासोबत खरंच कानातल्यांचं काहीतरी कर्म वगैरे आहे. अखंड लग्नात मी तुटलेलं कानातलं घालून मिरवत होते. मी अशीच फिरत होते मस्त. गेल्या जन्मात मी कुठल्या तरी कानातले विकणाºयाला वाईट वागवले असावे. काहीतरी त्याचा अपमान वगैरे केला असणार नक्कीच आणि त्यामुळे पुढच्या जन्मात तुला बघून घेईल, असं काहीतरी तो म्हणाला असावा. नाही तुझं कानातलं तोडलं भर फंक्शनमध्ये तर नावाचा कानातलेवाला नाही..., असं काहीतरी तो बोललं असणार. कदाचित त्याचा हा परिणाम असावा. मी जवळपास लग्नात शंभर लोकांसोबत तुटलेल्या कानातल्यासोबत असेच फोटो काढले पण लोकं पण बिचारे काहीही बोलले नाहीत...पण आता कमेंटमध्ये सांगतील की.. मी सांगणार होते...असा काहीसा मजेदार किस्सा तिनं शेअर केला आहे.

क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘छान दिसतात असे ही कानातले... कोणी विचारलंच तर सांगायचे फॅशन आहे...,’अशी कमेंट एका चाहत्याने केली. तुमच्या कायम कानातल्यासोबत गोंधळ असतो, अशी कमेंट अन्य एकाने केली आहे. ‘  तुमचं असं आधी एकदा सुद्धा झालं होतं वेगळ्या चपला वगैरे सुद्धा घातल्या जातात चुकून... पण कमार्चा कानातले वाल्याचा डायलॉग भारी ...’, अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे. 

टॅग्स :क्रांती रेडकर