Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूपच वेदनादायी होतं! मराठी अभिनेत्रीला झाला चिकनगुनिया, म्हणाली- "एक साला मच्छर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:16 IST

किशोरी गोडबोलेला चिकनगुनिया झाला आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट्स दिले आहेत.

किशोरी गोडबोले ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या ती कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. किशोरी गोडबोलेला चिकनगुनिया झाला आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट्स दिले आहेत. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या किशोरीने गेल्या महिन्याभरापासून काहीच पोस्ट केली नव्हती. त्यामुळे चाहतेही संभ्रमात होते. चिकनगुनिया झाल्यामुळेच सोशल मीडियावर अपडेट्स देऊ शकली नसल्याचा खुलासा नुकताच किशोरीने केला आहे. किशोरीने तिचा एक गोड फोटो शेअर करत चिकनगुनिया झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमधून तिने चाहत्यांची माफीही मागितली आहे. 

"माफ करा...खूप वेळाने काहीतरी पोस्ट करत आहे. मला चिकनगुनिया झाला होता.त्यातूनच बरे होण्यासाठी उपचार घेत होते. हे खूपच वेदनादायी होतं. तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. ओडोमॉस वापरा किंवा मच्छरांपासून बचाव करा. घरात धूप करा, कापूर जाळा...साला एक मच्छर...", असं किशोरीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला काळजी घेऊन लवकर बरे होण्यास सांगितलं आहे. 

किशोरी गोडबोले ही नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे. किशोरीने 'मिसेस तेंडुलकर', 'माधुरी मिडल क्लास', 'अधुरी एक कहाणी', 'हद कर दि', 'एक दो तीन', 'खिडकी','मेरे साई' यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.  'फुल ३ धमाल', 'खबरदार', 'कोहराम', 'वन रूम किचन', 'माझा नवरा तुझी बायको', 'हवाहवाई' यांसारख्या चित्रपटांतही ती झळकली आहे.

टॅग्स :किशोरी गोडबोलेसेलिब्रिटी