Join us

'कायम दुसऱ्यांना..'; मालिकेत रमाची एन्ट्री होताच सहअभिनेत्रीने उघड केलं अनिता दातेचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:03 IST

Kirti Mehendale - Pendharkar: किर्तीने अनिताच्या स्वभावाविषयी एक गुपित सांगितलं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'नवा गडी नवं राज्य'. काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेचा समावेश आज लोकप्रिय मालिकांच्या यादीत केला जातो. त्यामुळे या मालिकेचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. अलिकडेच या मालिकेत रमाची म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिची पुन्हा एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अभिनेत्री किर्ती पेंढारकर हिने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

या मालिकेत किर्तीने आनंदीच्या नणंदेची म्हणजेच वर्षाची भूमिका साकारली आहे. किर्ती सोशल मीडियावर सक्रीय असून अलिकडेच तिने अनिताच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. सोबतच तिच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.

"Happy Birthday अनिता..काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती कि 'ती परत आलीये, आता मज्जा येणार'. तू परत आल्याने सिरीयलमध्ये तर मज्जा येतेच. आहे पण तुझ्याबरोबर असल्याने, आम्हाला खूप मज्जा येतेय. तुझा sense of humour कमाल आहे. तुझं कामावरचं असलेले प्रेम आणि त्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय सुद्धा तू अगदी विचारपूर्वक घेतेस. कायम अशीच राहा आणि दुसऱ्यांना हसवत राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत", अशी पोस्ट शेअर करत किर्तीने अनिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत.

टॅग्स :अनिता दातेटेलिव्हिजनसेलिब्रिटी