Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुरांबा'मध्ये येणार ट्विस्ट; मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 11:03 IST

Muramba: या मालिकेतील रमा, अक्षय आणि रेवा या तीनही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळते. यात काही मालिकांनी तर अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यातलीच एक मालिका म्हणजे मुरांबा. उत्तम कलाकार आणि उत्तम कथानक यांच्या जोरावर ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीतही पहिल्या १५ मध्ये तिने तिचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या टेलीकास्टच्या वेळेत जरी बदल झाला असला तरीदेखील तिच्या लोकप्रियतेमध्ये जराही बदल झालेला नाही. मात्र, सगळं काही सुरळ असतांना या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

या मालिकेतील रमा, अक्षय आणि रेवा या तीनही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. या तिघांव्यतिरिक्त अन्य कलाकारही प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असतात. यातल्याच एका दिग्गज अभिनेत्रीने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. ही अभिनेत्री म्हणजे काजल काटे.

मुरांबा या मालिकेत काजलने आरतीही भूमिका साकारली असून नुकतंच तिच्या लेकीचं बारस झालं आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच आता काजलने ही मालिका सोडली आहे.काजलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने या मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली. गेल्याच आठवड्यात तिने तिच्या शूटिंगचं शेड्युल पूर्ण केलं असून मालिकेला निरोप दिला आहे. या मालिकेच्या सेटवरचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. परंतु, तिच्या एक्झिटमुळेही मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

दरम्यान, काजलपूर्वी आरतीची भूमिका शाश्वती पिंपळीकर हिने साकारली होती. मात्र, शाश्वतीने वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा