Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hruta Durgule : एक बॉटल, दोन ग्लास...; हृता दुर्गुळेचा ‘फर्स्टक्लास’ उखाणा ऐकला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:33 IST

Hruta Durgule : उखाणा घेतानाचा हृता दुर्गुळेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही महिन्यांआधी हृताचं लग्न झालं. यानंतर तिचे एकापाठोपाठ एक असे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. सध्या मात्र हृता वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे, तिचा धम्माल उखाणा.होय, झी मराठीवरील ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas)या कार्यक्रमात हृतानं हजेरी लावली. या कार्यक्रमात  हृताची पहिली मंगळागौर पार पडली. यावेळी मंगळागौरीचे खेळ रंगले. शिवाय हृताचा उखाणाही. उखाणा घेतानाचा तिचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

 झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हृताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृता काही बायकांसोबत मंगळगौर खेळताना दिसते. त्यानंतर काही बायका तिला उखाणा घेण्याचा आग्रह करतात आणि हृता उखाणा घेते.

एक सोप्पा उखाणा घेऊ का? हसायचं नाही हं..., असं ती म्हणते आणि यानंतर उखाणा ऐकवते. ‘एक बॉटल, दोन ग्लास माझा प्रतीक फर्स्टक्लास...’असा उखाणा ती घेते.हृताने प्रसिद्धी टीव्ही दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्न केलं आहे. प्रतिकने बेहद 2, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, इक दिवाना था  या मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे. तर, प्रतिकची आई आणि हृताची सासूदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. बे दुणे साडे चार, मिस मॅच, माहेर माझं हे पंढरपूर, 'संभव असंभव  सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

हृताच्या कामाबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी हृताचा  ‘टाईमपास 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती पालवीच्या भूमिकेत दिसली होती. त्याआधी ‘अनन्या’ या चित्रपटात ती दिसली होती. हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.

टॅग्स :ऋता दूर्गुळेझी मराठी