Join us

मराठमोळ्या या अभिनेत्रीचं होतं दुबईत शेखसोबत अफेयर?, अखेर या चर्चेमागचा खुद्द अभिनेत्रीनेच केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 06:00 IST

कलाकारांच्या लिंकअपच्या चर्चादेखील अनेकदा ऐकायला मिळतात. पण मराठमोळ्या अभिनेत्रीबाबत एक मनोरंजक किस्सा समोर आला आहे.

कलाकारांचे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यदेखील चर्चेत येत असते. कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. कधी कधी कलाकार त्यांचे सीक्रेट्स सांगतात. तर काही जण याबद्दल भाष्य करणं टाळतात. कलाकारांच्या लिंकअपच्या चर्चादेखील ऐकायला मिळतात. पण अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत एक मनोरंजक किस्सा समोर आला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्य कायम चर्चेत आले आहे. ती जानेवारी, २०२०मध्ये नेहा शार्दुलसोबत लग्नगाठ बांधली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला. प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या कार्यक्रमामध्ये नेहाने हजेरी लावली होती. यावेळी तिला आतापर्यंतची तिने तिच्याबाबतच्या सर्वात वाईट अफवेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी नेहा पेंडसे म्हणाली, अफवा अशी नाही. पण मी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये नवीन होते. तेव्हा अमृता खानविलकरला वाटले होते की, दुबईमध्ये एका शेखबरोबर माझे अफेअर सुरू आहे.

ती पुढे म्हणाली की, मला तिने हे स्वतः सांगितले होते. तेव्हा मी तिला म्हटले होते की, तुला असे का वाटले? तेव्हा ती मला म्हणाली, अगं मराठीमध्ये तू अशी एकदम छान दिसते. शरीरयष्टीही अगदी उत्तम आहे. म्हणून मला असे वाटले की तुझे दुबईमध्ये अफेअर आहे. यावर मी तिला असे काहीच नाही म्हटले होते. माझ्याशी बोलायलाच बहुतेक एखादा शेख घाबरला असावा. नेहाच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :नेहा पेंडसे