Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:21 IST

अश्विनी भावेंची लेक नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. अभिनेत्रीच्या लेकीने कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावेंचं नाव घेतलं जातं. दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारून मराठी सिनेसृष्टीत त्यांनी नाव कमावलं. तर प्रेक्षकांना त्यांच्या सौंदर्याने भुरळ घातली. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. अश्विनी भावेंचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्या सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहून अपडेट्स देत असतात. अश्विनी भावेंनी तिच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

अश्विनी भावेंची लेक नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. अभिनेत्रीच्या लेकीने कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. नुकताच तिचा ग्रॅज्युएशन डे पार पडला. लेकीच्या ग्रॅज्युएशन डेला अश्विनी भावे यांनी पती आणि लेकासह हजेरी लावली होती. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुलगी ग्रॅज्युएट झाल्याने अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "अभिनंदन बेटा, ABC पासून ते या अविस्मरणीय दिवसापर्यंत...तू आम्हा दोघांना अभिमान दिला आहेस. माझ्याकडे शब्द नाहीत", असं म्हणत त्यांनी लेकीचं कौतुक केलं आहे. अश्विनी भावेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, अश्विनी भावे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अशी ही बनवाबनवी, हळद रुसली कुंकू हसली, शाब्बास सुनबाई, वजीर अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या घरत गणपती सिनेमात त्या दिसल्या होत्या. अश्विनी भावे लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. कामानिमित्त त्या भारतात येत असतात. 

टॅग्स :अश्विनी भावेसेलिब्रिटी