Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरची नवी इनिंग, लग्नानंतर दोन महिन्यात सुरु केला 'हा' बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:31 IST

सोशल मीडियावर ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

सध्या अनेक कलाकार अभिनयासोबतच व्यवसायातही प्रवेश करत आहेत. काहींनी रेस्टॉरंट सुरु केलं आहे तर काहींनी स्वत:चं सलॉन उघडलं आहे. तर काहींनी साड्या, ज्वेलरीचा बिझनेही सुरु केला आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. तर आता तिने बिझनेस क्षेत्रात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने 'AdoreU nu Anushka' नावाने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे. इयररिंग्स, ब्रेसलेट्स, नेकलेस यांची व्हरायटी यामध्ये बघायला मिळत आहे. अनुष्का म्हणते, "ही माझी ज्वेलरी स्पेस आहे जी मी एका विशिष्ट दृष्टिकोनातून सुरु केली आहे. ही दररोज घालायला सहज सोपी पण स्टायलिश दिसेल अशी ज्वेलरी आहे. यामुळे स्वत:मध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो. यातलं सगळंच कलेक्शन मी वैयक्तिकरित्या निवडलं आहे.  मॉडर्न, टाईमलेस अशी ही ज्वेलरी आहे."

अनुष्काच्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्कासाठी सध्याचा काळ अत्यंत आनंदाचा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ती अभिनेता मेघन जाधव याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. मेघन आणि अनुष्काची जोडी 'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेत एकत्र दिसली होती आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सध्या मेघन 'लक्ष्मी निवास' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, तर अनुष्का आता अभिनयासोबतच बिझनेस वुमन म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Anushka Pimputkar starts new business venture after marriage.

Web Summary : Actress Anushka Pimputkar, known for 'Lagnanantar Hoilch Prem,' launched her jewelry brand, 'AdoreU nu Anushka,' two months after her wedding. The collection features earrings, bracelets, and necklaces, designed for everyday wear with a stylish and confident appeal.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारदागिनेव्यवसाय