Join us

अमृता खानविलकरला दुखापत! हाताला पट्टी बांधलेला फोटो केला शेअर; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:13 IST

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला झालेल्या दुखापतीबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सर्वांची लाडकी अभिनेत्री. अमृता कायमच सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करत असते. नुकतीच अमृताने एक पोस्ट शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटली आहे. अमृताने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केलेत. यामध्ये पहिल्या फोटोत अमृताने हाताला सूज आल्याचा फोटो दाखवलाय. तर दुसऱ्या फोटोत अमृताच्या हाताला पट्टी बांधली आहे. नेमकं काय झालं हे अमृताने सांगितलंय.

अमृता खानविलकरच्या हाताला दुखापत

फोटोंवरुन लक्षात येतंय की, अमृता खानविलकरच्या हाताला दुखापत झाली असून त्याला सूज आलीय. त्यामुळे अमृताने हाताला पट्टी बांधली आहे. अमृताने फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलंय की, "अजूनही यातून रिकव्हर होत आहे. तुम्ही जे पाहताय आणि तुम्ही जे पाहू शकत नाही. फक्त पुढे चालत राहा." कॅप्शनवरुन अमृताला दुखापत झाली असली तरी तिने तिच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही, हे दिसतंय. 

अमृताने सांगितलं काय झालं

दरम्यान अमृता खानविलकरला कमेंट्समध्ये एका चाहत्याने या दुखापतीबद्दल विचारलं, तुम्हाला माइल्ड फ्रॅक्चर झालंय का? यावर अमृताने रिप्लाय करुन सांगितलं की, "सुदैवाने कोणतंही फ्रॅक्चर नाही. फक्त soft tissue damage झालंय." अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'लाईक आणि सबस्क्राइब' या मराठी सिनेमात दिसली. हा सिनेमा प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर तुम्हाला पाहता येईल. याशिवाय 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अमृताच्या नृत्यनाट्याचा कार्यक्रम सध्या सुरु आहे.

टॅग्स :अमृता खानविलकर