Join us

'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:25 IST

मला राजकारण आवडतं मी बऱ्याच जणांच्या प्रचाराच्या सभा केल्या आहेत. पण आता...

सध्या जिकडे तिकडे केवळ राजकारणाचा विषय सुरु आहे. लोकसभा निवडणूकांचंही वातावरण आहे. कालच पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. सेलिब्रिटींमध्येही राजकारणाचं वारं वाहत असतं. अनेकांना एखाद्या पक्षाकडून ऑफरही मिळते. 'माहेरची साडी' फेम दिग्गज अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी नुकतंच राजकारणावर मत मांडलं. 

'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टरमध्ये दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या, "मी पक्षाचं नाव नाही घेणार, पण मला राजकारणात येण्याविषयी विचारलं होतं. मला राजकारण आवडतं मी बऱ्याच जणांच्या प्रचाराच्या सभा केल्या आहेत. आता नाही करणार पुन्हा कारण सध्याचं राजकारण फार खालच्या पातळीला गेलं आहे. पण गेल्या टर्मपर्यंत मी खूप सभा करायचे. दिवसाला तीन तीन अशा १५ दिवस सभा करायचे. महिला मेळावे घ्यायचे. आताही महिला मेळाव्यांना जाते."

"आता मला टिपिकल ह्याचा प्रचार वगरे आवडत नाही. कारण हे असं राजकारण माझ्या रक्तात नाही. याला गेंड्याची कातडी हवी. तुम्ही फार भावनिक असून चालणार नाही. सगळं तुम्हाला झोकून देऊन काम करावं लागतं. म्हणजे इथे शूटिंग आणि तिकडे महिला मेळावे करायचे असं करुन चालत नाही. एकदा राजकारणात पडलात तर पूर्ण पोहायला शिका."

काल अनेक सेलिब्रिटींनी मतदानाला हजेरी लावली. काहींनी सध्याच्या राजकारणावर टीकाही केली. आजही काही सेलिब्रिटी एखाद्या पक्षाच्या प्रचारार्थ मैदानात उतरतात. मात्र आता हे प्रमाण पुर्वीपेक्षा फारच कमी झाल्याचंही दिसून येतंय.

टॅग्स :अलका कुबलराजकारणमराठी अभिनेता