Join us

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे अक्षया देवधरचा भाऊ; रक्षाबंधन साजरं करत शेअर केला video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:49 IST

Akshaya deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील कलाकारांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. तसंच ते ऑफस्क्रीनदेखील त्यांनी टिकवून ठेवलं आहे.

बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा दिवस साजरा करण्यात बिझी आहे. यात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यात अभिनेत्री अक्षया देवधरदेखील मागे नाही. अक्षयाने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील एका अभिनेत्याला राखी बांधून त्याला भावाचा दर्जा दिला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील कलाकारांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. तसंच ते ऑफस्क्रीनदेखील त्यांनी टिकवून ठेवलं आहे. या मालिकेतील बरकत ही भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईक (Amol Naik) याला अक्षयाने भाऊ मानलं असून दरवर्षी ती त्याच्यासोबत रक्षाबंधन, भाऊबीज साजरी करते. यावेळीदेखील तिने रक्षाबंधन साजरं केलं.

दरम्यान, अमोलने इन्स्टाग्रामवर अक्षया आणि त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया त्याला राखी बांधताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने अक्षयालाही टॅग केलं आहे. 

टॅग्स :रक्षाबंधनअक्षया देवधरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार