Join us

एक नवी सुरुवात म्हणत उमेश कामत निघाला परदेशात, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:10 IST

उमेश कामतची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे उमेशची पत्नी प्रिया बापटनेही यावर कमेंट केलीय.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

उमेश कामतची एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत उमेश विमानात बसलेले दिसतोय. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून उमेशने हा फोटो शेअर केला आहे. उमेश लंडनला जातोय. हे त्याच्या कॅप्शनवरुन कळतंय. नवीन सुरुवात करण्यासाठी .....असे कॅप्शन त्याने या फोटोसह दिले आहे. प्रिया बापटने यावर मिस यू अशी कमेंट केलीय. हॅप्पी जर्नी, लंडन ला ! मस्त शहर आहे!, कुठे दौरा आहे अशा कमेंट्स उमेशच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

उमेश त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला चालला असल्याचे समजतं आहे. उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल तर, ‘आणखी काय हवं’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. यानंतर उमेश सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट