Join us

नको, मला क्युट उमेशच आवडतो...; उमेश कामतचा नवा लुक पाहून चाहते ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:29 IST

Umesh Kamat New Look : ‘कसा आहे माझा लुक?,’असा सवाल उमेश कामतने फोटो शेअर करत विचारला. मग काय चाहत्यांनी कमेंट्सचा जणू वर्षाव केला.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत  (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. पण सध्या एका वेगळ्याच कारणानं त्याची चर्चा होतेय. होय, उमेश कामतच्या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याच्या या लुकवरच्या कमेंट्स इतक्या भारी आहेत की, त्या वाचून वेगळंच मनोरंजन व्हावं. उमेश कामतने इन्स्टावर स्वत:चा नव्या लुकमधील फोटो शेअर केला आहे.‘कसा आहे माझा लुक?,’असा सवाल त्याने हा फोटो शेअर करत विचारला. मग काय चाहत्यांनी कमेंट्सचा जणू वर्षाव केला.

भाई कडक, फुल दुबई लुक, अशी कमेंट एका चाहत्याने केली. कुणी त्याच्या या लुकची तुलना आमिर खानच्या ‘तलाश’मधील लुकशी केली. कडक, एक नंबर अशा कमेंट्स करत अनेकांनी त्याच्या या राऊडी लुकचं कौतुक केलं.  कमाल..बहारतर कुणी चिकना म्हणत त्याच्या या लुकवर हार्ट इमोजी पोस्ट केले. काही कमेंट्स लक्षवेधी ठरल्या.

‘नको, मला क्युट उमेशच आवडतो,’असं एका चाहतीने लिहिलं. अन्य एका चाहतीनेही काहीशी अशीच कमेंट केली.   वीना मिशीचाच क्यूट दिसतोस??, असं या चाहतीने लिहिलं.    उमेशच्या ‘आणखी काय हवं’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता.  यानंतर उमेश सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला. या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे.

प्रिया अन् उमेशचं सीक्रेट

उमेशने प्रियासोबतचा एक रिलही शेअर केला आहे. यात उमेश त्याच्या व प्रिया बापटच्या सुखी संसाराचं सीक्रेट सांगत आहेत. दोघांपैकी एक पर्सन क्रेझी आहे अन् दुसरा कमालीचा बोअरिंग. आता कोण बोअरिंग अन् कोण क्रेझी हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ बघावा लागेल.

टॅग्स :उमेश कामत