Join us

कौतुकास्पद! अभिनेता शुभंकर तावडेला एक नाही तर तब्बल चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:16 IST

शुभंकर तावडेला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.

कागर’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत डेब्यू केलेला अभिनेता शुभंकर तावडे एक उत्तम अभिनेता आहे.  हे त्याने आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सिध्द केले आहेच. पण आता त्याच्या सर्वोत्तम अभिनयावर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटलीय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या त्याच्या उत्तम अभिनयासाठी त्याला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.

इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता अशा चार फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला आहे.

अभिनेता शुभंकर तावडे म्हणतो , “आपला अभिनय देश-विदेशातल्या सिनेरसिकांनी पाहावा, ही सुप्त इच्छा प्रत्येक अभिनेत्याची असते.त्यामुळे देशात आणि परदेशातल्या 65 फिल्म फेस्टिवलमध्ये माझी फिल्म झळकणे ही गोष्टच माझ्यासाठी भारावून जाणारी होती. त्यात अनेक ठिकाणी माझ्या अभिनयाचे कौतुक झाले, हे ऐकून मी आनंदित होतोच. पण त्याहूनही पूढे जात अभिनयासाठीचे सर्वोत्कृष्ट चार पुरस्कार प्राप्त करणे, हा तर दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. हे सगळं अगदी स्वप्नवत आहे.” 

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी