Join us
Daily Top 2Weekly Top 5

“गांधीजींची अहिंसा जरा अतीच झाली”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्यामुळे आज आपल्याला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:42 IST

"मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा...", शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत

संभाजी भिडेंनी अमरावती दौऱ्यादरम्यान महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे त्यांचे वडील नसून मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा दावा भिडेंनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मराठी अभिनेताशरद पोंक्षेंनी महात्मा गांधीबद्दल केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.

शरद पोंक्षेंनी नुकतीच मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती या पोडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत पोंक्षेंनी महात्मा गांधींबद्दल भाष्य केलं आहे. शरद पोंक्षे म्हणाले, “जेव्हा मी स्टेजवर गांधीजींना गोळी मारायचो आणि टाळ्या पडायच्या...त्याबद्दल मी माझ्या पुस्तकात खंत व्यक्त केली आहे. मतमतांतरं असू शकतात, आपली विचारसरणी वेगवेगळी असू शकते. पण, ही माणसं मोठी आहेत. मी सावरकरवादी आहे. पण, इतर लोक ज्यापद्धतीने असंस्कृत शब्द वापरुन हेटाळणी करतात, तसं मी चुकूनही बोलू शकणार नाही.”

“देशात राजकारण्यांची भीती घातली आहे”, शशांकचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाला, “खड्ड्यांमुळे गाडीचे टायर...”

“गांधीजींचं मोठेपण मी कधीच अमान्य करू शकत नाही. पण, त्यांची पराकोटीची अहिंसा जरा अतीच झाली. आणि मुस्लीम लांघुलचा...याचा परिपाक इतका झाला की आज त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा कधी सोडणार नाही, ही पातळी सोडू शकत नाही. ते त्या माणसाचं मोठेपण आहे,” असंही पुढे शरद पोंक्षे म्हणाले.

“फडणवीस आता शिंदेजी आणि अजितजी यांची मजा...”, भिडेंच्या वक्तव्यानंतर किशोर कदमांची पोस्ट

दरम्यान, शरद पोंक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक घडामोडींबद्दल ते पोस्टमधून व्यक्त होताना दिसतात. शरद पोंक्षेंनी नुकतीच त्यांच्या पायलट झालेल्या मुलीसाठी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

टॅग्स :महात्मा गांधीशरद पोंक्षेमराठी अभिनेता