सचिन तेंडुलकरची क्रिकेटचा देव म्हणून ओळख आहे. सचिन तेंडुलकरचे भारतात नव्हे तर जगभरात चाहते आहेत. क्रिकेट पाहणाऱ्या आणि न पाहणाऱ्या माणसांनीही सचिनबद्दल नितांत आदर आहे. सचिन तेंडुलकरला भेटणं आणि त्याच्याशी बोलणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्नपूर्तीचा असाच अनुभव अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला आलाय. संकर्षणने सचिन तेंडुलकरच्या भेटीचा अनुभव खास शब्दात मांडलाय.
संकर्षणने सचिनचे फोटो शेअर करुन लिहिलंय की, "काय बोलायचं …??? फक्तं अनुभवायचं … आज पुण्यात “चितळे परिवाराने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली… पाहुणा कोण होता …??? साक्षात “क्रिकेटचा देsssव” भारतरत्नं सचिन तेंडूलकर ... ५ मिनिटं शांतपणे बोलता आलं… ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला … जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला …"
"“भारतरत्नं” असलेल्या “सचिन” सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं … ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली… माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अन्नेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजुन काय पाहिजे …??? आकाशातल्या देवा sss आभार... तू जमिनीवरचा देव दावला." अशाप्रकारे संकर्षणने त्याचा अनुभव शब्दबद्ध केलाय. सचिन-संकर्षणच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.