Join us
Daily Top 2Weekly Top 5

"1 वर्ष झालं, तुझी उणीव सतत जाणवते...", हार्दिक जोशीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 09:51 IST

हार्दिक जोशीच्या मोठ्या वहिनीचं गेल्यावर्षी निधन झालं.

अभिनेता हार्दिक जोशीच्या (Hardeek Joshi) मोठ्या वहिनीचं गेल्यावर्षी निधन झालं. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. हार्दिक आणि त्याच्या वहिनीचं जवळचं नातं होतं. आपल्या वहिनीची उणीव अभिनेत्याला कायम भासत असते.  आता वहिणीच्या आठवणीत हार्दिकने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकसोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधरने देखील पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावर वहिनीसोबतचा फोटो शेअर केला आहे.  या फोटोला हार्दिकने भावुक होत कॅप्शन दिले आहे.  त्याने लिहलं, "आज 24 नोव्हेंबर तुला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं. पण आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार. तुझ्या गोड आठवणी तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत आणि कायम आमच्या सोबत राहणार". हार्दिकची ही भावुक पोस्ट त्याची पत्नी अक्षयाने देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केली आहे. या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी दु:ख व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान,  'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमाचं श्रेयही हार्दिकने त्याच्या वहिनीला दिलं होतं. 'जाऊ बाई जोरात' कार्यक्रमाविषयी बोलताना तो म्हणाला होता, "माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी  खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो".

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधर