Join us

'मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर...'; कशासंदर्भात आहे गश्मीरची पोस्ट? नेटकरी लावतायेत तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:03 IST

Gashmeer mahajani:नेमकी कशासंदर्भात आहे गश्मीरची पोस्ट?

प्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. गश्मीरचे वडील ज्येष्ठ अभिनेता रविंद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी गश्मीरला ट्रोल केलं होतं. त्यानंतर योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन असं म्हणत गश्मीरने रविंद्र महाजनी यांच्या निधनावर भाष्य केलं होतं. तसंच सोशल मीडियावरही त्याने नेटकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. नुकतीच त्याने केलेली एक पोस्ट चर्चेत येत आहे.

गश्मीर सोशल मीडियावर सक्रीय आहे त्यामुळे तो वरचेवर काही ना काही पोस्ट करत असतो. यावेळी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये  एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

"एक स्वप्न आहे. ते रोज येतं. कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं. मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही. मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला. माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो. तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं. म्हातारं झालं आणि लाचार झालं", असं गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या गश्मीरने कामातून ब्रेक घेतला आहे. परंतु, ऑक्टोबर महिन्यापासून तो पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लवकरच तो नवीन प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं होतं. 

टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटीरवींद्र महाजनी