Jay Dudhane:मुंबई (Mumbai) शहरातील वाहतुक कोंडीचा (Traffic)प्रश्न जटिल होत चालला आहे. हे जणू एक समीकरणच बनलं आहे. सध्या मुंबईत वेगवेगळ्या ठिकठिकाणी रस्त्यांची आणि मेट्रोची कामे मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. यावर आता मराठी अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. हा अभिनेता म्हणजे जय दुधाणे (Jay Dudhane)आहे. कामाच्या ठिकाणी जात असताना ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाब्दिक फटकेबाजी केली आहे.
जय दुधाणेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत सध्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मायानगरी मुंबईत वाढत चालेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत अभिनेत्याने लिहिलंय, "अमेरिकेसारखे रस्ते दोन वर्षात...", (पुढे त्याने हसण्याचा इमोजी जोडला आहे) त्यानंतर जयने लिहिलंय "आधी मेट्रो तर बनवा, १० वर्षे झाली भाई साहेब... अशा शब्दांत त्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
वर्कफ्रंट
जय दुधाणेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात तो सहभागी झाला होता. याशिवाय 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत सुद्धा तो झळकला आहे. तसंच 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर आहे.