Join us

मी चाललो जामनगरला! मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले, "तुला पण अंबानींनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:35 IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच आता मराठमोळा अभिनेता जामनगरला गेला आहे. 

सध्या जिकडेतिकडे अंबानींच्या प्री वेडिंग फंक्शनची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अनंत आणि राधिकाचा प्री वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. ३ दिवसांच्या या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याबरोबरच अनेक दिग्गजही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. अशातच आता मराठमोळा अभिनेता जामनगरला गेला आहे. 

'३६ गुणी जोडी' या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आयुष सांळुके. या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आयुषने अभिनयानाची छाप पाडली. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. आयुषने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. "जामनगरला चाललो" असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

एकाने कमेंट करत "तू पण चाललास", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "तुला पण अंबानींनी बोलवलं का?" अशी कमेंट केली आहे. "ओहो तुला पण अंबानींनी निमंत्रण दिलं", "पोरगा ऐकत नाही" अशा कमेंट्सही केल्या आहेत. 

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता प्री वेडिंगनंतर जुलै महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :मुकेश अंबानीनीता अंबानीमराठी अभिनेता