Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोह वेलणकर बनला बाबा, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 18:54 IST

अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत अगदी व्यवस्थित असून बाळाच्या आगमनामुळे आरोह प्रचंड खूश झाला आहे.

ठळक मुद्देआरोहच्या पत्नीचे नाव अंकिता शिंगवी असून महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले होते. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते.

अभिनेता आरोह वेलणकरच्या आयुष्यात नुकतेच एका चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी अंकिताने आज संध्याकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत अगदी व्यवस्थित असून बाळाच्या आगमनामुळे आरोह प्रचंड खूश झाला आहे.

आरोहच्या पत्नीचे नाव अंकिता शिंगवी असून महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले होते. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंना चाहतेदेखील तुफान पंसती देत असतात. अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही. 

आरोहने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत त्याची ही गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. आरोह आणि अंकिताचे हे पहिलेच बाळ असून त्याच्या आगमनाची ते आतुरतेने वाट पाहात होते. 

बिग बॉस मराठीच्या घरात आरोह झळकला होता. तसेच त्याने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. लाडाची मी लेक गं ही त्याची मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला होता. दिव्यांगांसाठीही तो काम करतो. 

टॅग्स :आरोह वेलणकर