Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंशुमन विचारेनं मोठ्या हौसेने घेतलं नवीन घर, पण आता होतोय पश्चात्ताप, नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 11:51 IST

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे.

खरंतर आपल्या आयुष्यात आपली अनेक स्वप्न पाहिलेली असतात. आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट घेऊन सगळेच मेहनत घेत असतात. यात बकेट लिस्टमध्ये नवं घर घेणं ही तर सर्वांत खास गोष्ट असते. प्रत्येकासाठी आपलं हक्काच घर खूप महत्त्वाचं आणि जवळचं असतं. नव्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप झटावे लागते. हेचं स्वप्न अभिनेता अंशुमन विचारेनं पाहिलं आणि मोठ्या कष्टानं स्वत:चं हक्काच घर घेतलं देखील. पण, त्या घरात तो राहायला जाऊ शकत नाहीये. 

अंशुमन आणि त्याची पत्नी यांचं एक युट्यूब चॅनेल आहे. यावर ते चाहत्यांसोबत जोडलले असतात. अंशुमन विचारेनं काही महिन्यांपुर्वी एक व्हिडिओ शेअर करत आपण नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र आता अंशुमनला पश्चताप होतोय. कारण, अंशुमन विचारेनं घेतलेलं घर हे अजुनही अंडर कंस्ट्रक्शन असून त्याला घराचा ताबा मिळालेला नाही. २०२० मध्ये घर बुक केलं होतं आणि २०२३ मध्ये या घराचा ताबा मिळणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही घर मिळालेलं नसल्याचं अंशुमनच्या पत्नीनं सांगितलं. 

अंशुमननेही वेळेत घर न मिळाल्यानं संताप व्यक्त केला आहे. शिवाय, अंडर कंस्ट्रक्शन घर घेताना विचार करा असा सल्ला अंशुमन याने चाहत्यांना दिला आहे. अंशुमन आपल्या कुटुंबासह  सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. सध्या राहात असलेल्या घराचं अग्रीमेंट संपल्याने आता अंशुमन दुसऱ्या भाड्याच्या  घरात शिफ्ट होत आहे. आता सामान शिफ्टिंग करताना नाकी नऊ येत असल्याचंही त्यानं सांगितले. अंशुमन हा 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'फू बाई फू', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशा विनोदी कार्यक्रमांमुळे अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या दमदार विनोदशैलीने अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

टॅग्स :अंशुमन विचारेसेलिब्रिटीमराठी अभिनेता