Join us

'पुढचा प्रवास खडतर असेल तर...'; अमेयची साथ द्यायला घरी आला नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 19:06 IST

Amey wagh: अमेयने त्याच्या वाढदिवशी स्वत:लाच एक रॉयल भेट दिली आहे. त्यामुळे त्याच्या या भेटवस्तूची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ (amey wagh). उत्तम अभिनयशैली आणि हजरजबाबीपणा यामुळे अमेय कायमच चर्चेत असतो. परंतु, यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अमेयने त्याच्या वाढदिवशी स्वत:लाच एक रॉयल भेट दिली आहे. त्यामुळे त्याच्या या भेटवस्तूची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

अमेयने त्याच्या वाढदिवशी नवी कोरी मर्सिडीज् कार खरेदी केली आहे. या नव्या कोऱ्या गाडीचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्याच्या डोळ्यात कष्टाने घेतलेल्या गाडीचा आनंद दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करत त्याने दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 'पुढचा प्रवास खडतर असेल तर तो मर्सेडिजने करावा म्हणतो!' , असं कॅप्शन त्याने ही पोस्ट शेअर करत दिलं आहे. दरम्यान, अमेयच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, अमेय वाघ हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवरच्या कारकिर्दीत अमेय अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेब सीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

टॅग्स :अमेय वाघसेलिब्रिटीटेलिव्हिजन